Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

भारत-कझाकस्तानमध्ये पाच करार

india-kajakistan  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कझाकस्तान दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये पाच महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. या करारांमध्ये युरेनियम पुरठ्यासंदर्भातील करारासहित लष्करी सहकार्य वाढविण्याबाबतच्या कराराचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकस्तानचे अध्यक्ष नूरसुलतान नजरबाएफ या दोघांदरम्यान झालेल्या चर्चेनंतर करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

'विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा झाली. शांतता, विकास, विविध क्षेत्रामधील सहकार्य याबाबत नजरबाएफ यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठीही दोन्ही देश सज्ज आहेत. दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेत दहशतवाद व मूलतत्त्ववादाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच द्विपक्षीय व्यापाराच्या प्रक्रियेमधील सध्या असलेले अडथळे दूर करून भारत व कझाकस्तानमधील व्यापाराच्या वृद्धीसाठी एकत्र काम करण्यासही भेटीदरम्यान मान्यता देण्यात आली.

'आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा'

संरक्षण क्षेत्रामधील सहकार्य हा दोन देशांमधील व्यूहात्मक भागीदारीचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी या वेळी केले. 'प्रादेशिक शांतता, दळणवळण, संयुक्त राष्ट्रसंघामधील सुधारणा, दहशतवाद यांसह अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा झाली. याचबरोबर संरक्षण क्षेत्रामधील भागीदारी बळकट करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला आहे.

काय आहे सामंजस्य करार?

- भारत व कझाकस्तानमध्ये संरक्षण क्षेत्रामधील सामंजस्य करार करण्यात आल्याची घोषणा या वेळी करण्यात आली.

- या करारामुळे दोन देशांमधील संरक्षण क्षेत्रामधील सहकार्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे.

- भारताला मोठ्या कालावधीसाठी नैसर्गिक युरेनियमचा पुरवठा करण्यासंदर्भातील कराराचे पुनरुज्जीवनही या वेळी करण्यात आले.

- संरक्षण क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण एससीओ सदस्यत्वाबाबत चर्चा.

भारत व रशिया यांच्यातील महत्त्वपूर्ण द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यास वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी बुधवारी स्पष्ट केले. भारताला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे (एससीओ) सदस्यत्व देण्याच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ब्रिक्स तसेच एससीओ परिषदेच्या निमित्ताने रशियाला दौऱ्यावर गेलेले मोदी यांनी पुतीन यांची भेट घेतली.