Whats new

चुरायुमोव-गेरासीमेन्को धूमकेतूवर सूक्ष्म जीव

PHILAE-COMET  

युरोपचे फिली लँडर ६७ पी-चुरायुमोव-गेरासीमेन्को धूमकेतूवर उतरले असून तेथे सूक्ष्मजीवसृष्टी असण्याची शक्यता ब्रिटनच्या दोन खगोलशास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. तेथे आर्क्टिक व अंटार्टिकापेक्षाही अनुकूल स्थिती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

वैज्ञानिकांच्या मते ६७ पी-चुरायुमोव-गेरासीमेन्को धूमकेतूचे कवच हे काळसर रंगाचे असून तेथे सेंद्रिय द्रव्ये असण्याची शक्यता आहे, या धूमकेतूच्या बर्फाच्छादित भागाच्या खाली सूक्ष्मजीव असू शकतात. युरोपीय अवकाश संस्थेचे 'रोसेटा' हा अवकाश यान या धूमकेतूभोवती फिरत असून त्याने जी छायाचित्रे घेतली आहेत, त्यात सेंद्रिय पदार्थाचे थर दिसत आहेत. ते सूक्ष्म कणांचे बनलेले आहे. खगोल जीवशास्त्रज्ञ चंद्रा विक्रमसिंगे व त्यांचे सहकारी डॉ. मॅक्स विलीस यांनी ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठात ६७ पी-चुरायुमोव-गेरासीमेन्को व इतर धूमकेतूंवर संशोधन केले असून त्यांच्या मते तेथे एक्स्ट्रीमोफाइल्स म्हणजे अतिप्रतिकूल स्थितीत राहणारे सूक्ष्म जीव असू शकतात. पृथ्वीवरही असे प्रतिकूल परिस्थितीत राहणारे सूक्ष्मजीव आहेत.