Whats new

'आयआयएस' बंगळूर जगात पाचव्या क्रमांकावर

IIS  

जगभरातील शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांचे आकर्षणबिंदू ठरलेल्या "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बंगळूर” या संस्थेने ‘ब्रिक्सराष्ट्रांमधील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये जागा मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रमवारीचा विचार केला असता हे विद्यापीठ पाचव्या स्थानावर असल्याचे दिसून येते
क्यूएस युनिव्हर्सिटी रॅंकिंग : ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) 2015 हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या खेपेसही चिनी विद्यापीठांनी आघाडी घेतल्याचे दिसून येते. तिसींगहुआ, पेकिंग आणि फुदान या तिन्ही विद्यापीठांनी आघाडीचे स्थान पटकावले आहे. बंगळूरमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ ही संस्था पाचव्या स्थानावर आहे. हे सर्वेक्षण करण्याआधी संबंधित विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय ख्याती, तेथे शिकविणाऱ्या प्राध्यापकांचा दर्जा आणि तेथे होणारे संशोधन आणि त्याचा जगावर झालेल्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला होता. पहिल्या टॉप टेन विद्यापीठाच्या रांगेमध्ये चीनचाच वरचष्मा असल्याचे दिसून येते

चिनी जलवा 
टॉपटेन विद्यापीठांमध्ये चीनच्या सात संस्था आहेत तर आघाडीच्या 50 विद्यापीठांमध्ये चीनच्या निम्म्याहून अधिक संस्थांचा समावेश होतो. आघाडीच्या दोनशे विद्यापीठांत 53 संस्थांसह रशिया दुसऱ्या स्थानी असून, चीनच्या 67 विद्यापीठांचा यात समावेश होतो. तसेच आघाडीच्या पन्नास संस्थांमध्ये ब्राझीलच्या 10 आणि भारतातील 9 संस्थांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.