Whats new

मोदी-शरीफ यांच्यात पाच मुद्यांवर सहमती

india-pakistan  

द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक अशा पाच महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ या दोन्ही नेत्यांनी चर्चा करून सहमती दर्शवली. 
शांतता राखणे, विकासाला प्रोत्साहन देणे ही भारत आणि पाकिस्तानची सामूहिक जबाबदारी आहे, यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. तसेच, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा दोन्ही नेत्यांनी निषेध केला, आणि हे संकट दक्षिण आशियातून नष्ट करण्यासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली. 
शांघाय सहकार संघटनेच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने उफा येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट चर्चा झाली. मैत्रीपूर्ण वातावरणात ही बैठक झाली.