Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

इस्त्रो आज ब्रिटनचे पाच उपग्रह अंतराळात

ISRO  

इस्त्रोची सर्वात मोठी व्यावसायिक मोहिम पार पडणार आहे. पीएसएलव्ही सी-28 या उपग्रहाद्वारे इस्त्रो ब्रिटनचे पाच उपग्रह अंतराळात सोडणार आहे. ही मोहिम यशस्वी झाल्यास उपग्रहांचे व्यावसायिक प्रक्षेपण करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ब्रिटनच्या या पाचही उपग्रहाचे वजन 1440 किलोग्रॅम आहे. पीएसएलव्ही सी-28 हे क्षेपणास्त्र डीएमसी-3 या उपग्रहांना 647 किलोमीटर अंतरावर सन सिंनक्रोनस ऑब्रिटमध्ये प्रस्थापित करेल. सोबत दोन मायक्रो सॅटेलाईटही असतील. या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी इस्त्रोने दोन विशेष ऍडॉप्टर तयार केले आहेत. डीएमसीआयआय आणि अँट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात झालेल्या करारानुसार या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येत आहे.