Whats new

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात छेत्री, लिंगडोहने ओलांडला कोटीचा टप्पा

isl  

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामासाठी १० खेळाडूंच्या लागलेल्या बोलीत प्रमुख स्ट्रायकर सुनील छेत्री आणि युजिन्सन लिंगडोह यांच्यावर एक कोटीची बोली लागली. छेत्रीला १ कोटी २० लाख इतकी रक्कम मिळाली आणि मुंबई फुटबॉल क्लबने त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. त्यापेक्षा युजिन्सन लिंगडोह याला त्याच्या २७.५० या मूळ रकमेच्या तुलनेत जवळपास तिप्पट बोली मिळाली आणि त्यानेही एक कोटीचा टप्पा ओलांडला, पुणे सिटी फुटबॉल क्लबने त्याला १.०५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले.

१० खेळाडूंना मिळालेली रक्कम, कंसात मूळ रक्कम :

1.     सुनील छेत्री १.२० कोटी (मुंबई एफसी, ८० लाख)

2.     युजिन्सन लिंगडोह १.०५ कोटी (पुणे एफसी २७.५० लाख)

3.     रिनो अँटो ९० लाख (अॅटलेटिको डी कोलकाता, १७.५० लाख)

4.     थोई सिंग ८६ लाख (चेन्नईन एफसी, ३९ लाख)

5.    अराता इझुमी ६८ लाख (अॅटलेटिको डी कोलकाता, ४० लाख)

6.     करणजीत सिंग ६० लाख (चेन्नईन एफसी, ६० लाख)

7.     सित्यसेन सिंग ५६ लाख (नॉर्थ इस्ट युनायटेड, २० लाख)

8.     रॉबिनसिंग ५१ लाख (दिल्ली डायनॅमोज, ४० लाख)

9.     जॅकीचंद सिंग ४५ लाख (पुणे एफसी, २० लाख),

10.    अॅनास एडाथोडिका ४१ लाख (दिल्ली डायनॅमोज, ४० लाख)