Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

"इस्रो”ची अवजड मोहीम यशस्वी

ISRO  

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि तिचा व्यापारी विभाग असलेल्या ऍट्रिक्‍सने एकूण 1,440 किलो वजनाचे पाच व्यापारी उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडले. पीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या साह्याने प्रथमच इतक्‍या मोठ्या वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. भारताची आतापर्यंतची ही सर्वांत अवजड व्यापारी मोहीम होती. तसेच या वर्षातील ही पहिलीच व्यापारी मोहीम होती. या मोहिमेचा कार्यकाळ 7 वर्षे असेल.

‘पीएसएलव्ही‘चे सुधारित व्हर्जन असलेल्या "पीएसएलव्ही-एक्‍सएल” या प्रक्षेपकाने आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून ब्रिटनच्या या पाचही उपग्रहांना त्यांच्या कक्षेत सोडले. "पीएसएलव्ही-एक्‍सएल” हे चार टप्पे असलेले रॉकेट असून, सुरवातीच्या टप्प्यांमध्ये वेग मिळविण्याकरिता अतिरिक्त सहा मोटर्स बसविण्यात आल्या आहेत. पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात घन इंधनाचा वापर केला असून, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात द्रवरूप इंधनाचा वापर केला आहे. प्रक्षेपणापासून ते पाचवा उपग्रह अवकाशात सोडण्याचा कालावधी 19 मिनिटे 16 सेकंद इतका असणार आहे.

असे आहेत उपग्रह...

डीएमसी - 3 : ब्रिटनच्या पाचही उपग्रहांपैकी हे तीन उपग्रह एकसारखे आहेत. त्यांचे वजन प्रत्येकी 447 किलो आहे. पृथ्वीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने सोडण्यात आलेले हे तीनही उपग्रह पृथ्वीपासून 647 किमी अंतरावर सूर्यकक्षेत सोडले जाणार आहेत. या तीनही उपग्रहांची उंची प्रत्येकी तीन मीटर आहे. छायाचित्रे काढणे, नैसर्गिक स्रोतांची आणि पर्यावरणाची माहिती घेणे आणि आपत्कालीन स्थितीत माहिती पुरविणे हे या उपग्रहांचे प्रमुख काम असणार आहे.

सीबीएनटी-1 : हा उपग्रहही पृथ्वी निरीक्षणासाठी सोडला जाणार असून, त्याचे वजन 91 किलो आहे. हा प्रायोगिक तत्त्वावर सोडला जाणारा लघुउपग्रह असून याद्वारे नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाणार आहे.

डी-ऑर्बिट सेल : हा नॅनो उपग्रह असून त्याचे वजन फक्त 7 किलो आहे. हा उपग्रहसुद्धा प्रायोगिक तत्त्वावर सोडला जाणार आहे.

डीएमसी-3 आणि सीबीएनटी-1 हे उपग्रह सरे सॅटेलाइट टेक्‍नोलॉजीने तयार केले असून, डी-ऑर्बिट सेल हा उपग्रह सरे अवकाश संस्थेने तयार केला आहे.

तीन मीटर उंची असलेले डीएमसी-3 हे उपग्रह प्रक्षेपकावर बसविणे हे "इस्रो” समोरील आव्हान होते. यासाठी "इस्रो” ने वर्तुळाकार एल ऍडाप्टर आणि मल्टिपल सॅटेलाइट ऍडाप्टर व्हर्जन-2 नव्याने तयार करत हे आव्हान पेलले.

पीएसएलव्ही-एक्‍सएलची उंची : 44.4 मीटर

वजन : 320 टन

किंमत : 140 कोटी

45 : 1999 पासून भारताने सोडलेले परदेशी उपग्रह

30 वी : पीएसएलव्हीची मोहीम