Whats new

पोलादनिर्मितीत भारत तिसरा

steel  

सर्वाधिक पोलादनिर्मिती करणाऱ्या देशांच्या स्पर्धेत भारताने अमेरिकेला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले असून, आगामी दहा वर्षांमध्ये ३० कोटी टन पोलादनिर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय पोलाद आणि खाणमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.

जानेवारीच्या सुरुवातीला पोलादनिर्मितीमध्ये देश चौथ्या स्थानावर होता. त्यापुढे अव्वल स्थानावरील चीन, जपान आणि अमेरिका यांचाच क्रमांक होता. मात्र, जानेवारी ते जून २०१५ या कालावधीत आपण अमेरिकेला मागे टाकून तिसरे स्थान मिळवले आहे. देशात पोलादाचा दरडोई वापर बराच कमी आहे. जगभरात पोलादाचा दरडोई वापर २१६ किलो आहे, तर देशात हाच वापर ६० किलो इतका आहे.

उत्पादनात झालेली वाढ दिलासा देणार आहे. या पार्श्वभूमीवर आगामी दहा वर्षांमध्ये पोलाद उत्पादनात वाढ करून ते ३० कोटी टनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी मंत्रालयाने २०२५ पर्यंतचा रोडमॅपही आखला आहे, असे तोमर यांनी यावेळी नमूद केले.