Whats new

सर्वांत मोठ्या वादळ ‘चान-होम’ चीनमध्ये धडकले

chan home  

चीनमधील झेजियांग आणि झियांगसू प्रांतात  चान-होम नावाचे प्रचंड मोठे वादळ आले. त्‍यामुळे तब्‍बल 11 लाख व्‍यक्‍तींनी आपले घर सोडून सुरक्षित स्‍थळाकडे धाव घेतली; तर विमान, रेल्‍वे आणि दळण-वळण, फोन अशा सर्वच सुविधा ठप्‍प झाल्‍यात. 1949 नंतर चीनमध्‍ये आलेले हे सर्वात मोठे वादळ आहे.

झेजियांग प्रांताच्‍या प्रशासनाने सांगितले, वादळामुळे 410 मिलियन डॉलरचे (जवळपास 2590 कोटी रुपये) नुकसान झाले आहे. हे वादळ शंघाईच्‍या दक्षिण समुद्र किना-यावर भिडले. यावेळी हवेचा वेग 160 किलोमीटर प्रति तास होता.

जापान आणि तायवानसुद्धा फटका

वादळामुळे जापानच्‍या ओकिनावा द्वीप श्रृंखला आणि तायवानही प्रभावित झाला आहे. शुक्रवारी वादळामुळे तायवानची राजधानी तायपेमध्‍ये सरकारी सुटी घोषित करण्‍यात आली होती.