Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सेरेना विल्ययम्स बनली विम्बयल्डरन क्वीन

Serena Williams  

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने स्पेनच्या गारबीन मुगुरुझाचा पराभव करत विजेतेपद मिळविले. विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील सहावं आणि एकूण २१वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद सेरेना विल्यम्सच्या नावावर झाले आहे. विम्बल्डच्या अंतिम सामन्यात सेरेनाने गारबीनचा ६-४, ६-४ असा पराभव केला.

महिला टेनिस विश्वात दबदबा निर्माण करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने ‘विम्बल्डन’वर आपलेच राज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. स्पर्धेच्या एकेरीतील अंतिम सामन्यात तिने स्पेनच्या गार्बिन मुगूरुजावर एकतर्फी मात करीत सहाव्यांदा विम्बल्डन चषक पटकाविला.

एवढेच नव्हे, तर कारकीर्दीतील तिचे हे २१ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद ठरले. त्यामुळे ग्रॅण्डस्लॅमवर सध्यातरी सेरेनाचेच वर्चस्व दिसून येते. चारही ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या शर्यतीत ती सर्वात आघाडीवर आहे. याआधी सेरेनाने २००२-०३ मध्येही सुद्धा हा प्रताप केला होता. या वर्षी आस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचा मुकूट पटकाविणाऱ्या सेरेना आता अमेरिकन ओपनचा किताबही जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.

२१ वे ग्रँडस्लॅम

जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने टेनिस करिअरमध्ये २१ ग्रँडस्लॅम आपल्या नावे केले. तिचे या स्पर्धेचे हे सहावे अजिंक्यपद ठरले. सेरेनाने यापूर्वी २००२, २००३, २००९, २०१०, २०१२ मध्ये विम्बल्डन जिंकले होते.

आस्ट्रेलियन ओपन : २००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५.

फ्रेंच ओपन : २००२, २०१३, २०१५.

विम्बल्डन ओपन : २००२, २००३, २००९, २०१०, २०१२, २०१५.

अमेरिकन ओपन : १९९९, २००२, २००८, २०१२, २०१३, २०१४.