Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

नौदल सरावात जपान, चीनला दणका

india japan navalexer  

बंगालच्या उपसागारात होणाऱ्या नौदलाच्या सरावात जपानचा समावेश करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. या निर्णयाद्वारे सतत डिवचणाऱ्या चीनला भारताने सणसणीत टोला लगावला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे हा निर्णय प्रलंबित होता. याला मोदी सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्यापूर्वी जपानला नौदलाच्या सराव मोहीमेतून बाहेर ठेवण्याचा भारताचा विचार होता. पण काही दिवसांपूर्वी चीनने हिंदी महासागरातून पाकिस्तान पाणबुडी पाठवली. पण आभार मानन्या ऐवजी हिंदी महासागर हा भारताचा आहे असे समजू नये, असं वक्तव्य करत चीनने भारताला सुनावलं होतं. तसंच 'साऊथ चायना सी'मधील तेल संशोधनावरूनही चीन सतत भारताला इशारा देतोय. चीनच्या या आरेरावीला रोखण्यासाठी भारतानेही ठोस पाऊल उचललं आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार येत्या ऑक्टोबरमध्ये बंगालच्या उपसागरात होणाऱ्या १९ व्या भारत-अमेरिका मलबार नौदल युद्ध सरावात अमेरिकेच्या नौदलाबरोबर आता जपानी नौदलाचाही समावेश होणार आहे. तिन्ही देशांच्या नौदलातील युद्ध सरावाचा आराखडा या महिना अखेरपर्यंत तयार केला जाईल.

भारत-अमेरिका-जपान यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या मलबार नौदल सरावाच्या आधी भारत-ऑस्ट्रेलियातील नौदलांमध्ये पहिल्यांदाच सराव होणार आहे. ११ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर असा दहा दिवसांचा हा सराव बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमला होणार आहे.

२००७ मध्ये बंगालच्या उपसागरात झालेल्या मलबार सागरी युद्ध सरावात जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरच्या नौदालाचा समावेश केल्याबद्दल चीनने भारताकडे तीव्र आक्षेप नोंदवला होता. तसंच पुढील सुरक्षेच्या दृष्टीने चीनने त्यावेळी संपूर्ण सरावावर नजर ठेवली होती. चीनच्या आक्षेपानंतर नौदलाने भारताबाहेर जपानबरोबर सराव केला होता. २००९ आणि २०१४ मध्ये पॅसिपिक सागरात भारताने जपानबरोबर सराव केला.