Whats new

विंबल्डन स्पर्धा 2015 -मिश्र दुहेरीमध्ये पेस-हिंगीस विजेते

liyandar pes martin ingis  

भारतीयांसाठी यंदाची विंबल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली. महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले. झालेल्या अंतिम लढतीत पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीत ऍलेक्‍झांडर पेया (ऑस्ट्रिया) आणि टिमेआ बाबोस (हंगेरी) यांचा 6-1, 6-1 असा चाळीस मिनिटांत फडशा पाडला.

हिंगीसला या स्पर्धेत दुसरे विजेतेपद मिळाले. तिने भारताच्याच सानिया मिर्झाच्या साथीत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. पेस आणि हिंगीस जोडीचे हे मोसमातील दुसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. त्यांनी या वर्षी ऑस्ट्रेलिया स्पर्धेतही विजेतेपद मिळविले आहे.

पेसचे हे सोळावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. यामध्ये पुरुष दुहेरीत त्याने ऑस्ट्रेलिया (2012), फ्रेंच (1999, 2001, 2009) विंबल्डन (1999), अमेरिका (2006, 2009, 2013), तर मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलिया (2003, 2010, 2015), विंबल्डन (1999, 2003, 2010, 2015) आणि अमेरिका (2008) या विजेतेपदांचा समावेश आहे. मिश्र दुहेरीत त्याने आठव्यांदा ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले.