Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद : नोव्हाक जोकोविच

novok jokovitch  

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद राखले. अंतिम लढतीत गतविजेत्या जोकोविचने पुन्हा एकदा स्वित्झर्लंडचा टेनिस स्टार रॉजर फेडररवर ७-६ (१), ६-७ (१०), ६-४, ६-३ अशी मात केली. जोकोविचचे हे 'विम्बल्डन'च्या पुरुष एकेरीचे तिसरे जेतेपद ठरले. जागतिक क्रमवारीत जोकोविच अव्वल, तर फेडरर दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत हे दोघे ३९ वेळा आमनेसामने आले होते. त्यात फेडररने २० वेळा, तर जोकोविचने १९ वेळा बाजी मारली होती.

स्टॅट्स कॉर्नर :

९ - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचे हे पुरुष एकेरीतील एकूण नववे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. यापूर्वी जोकोविचने २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, २०११ आणि २०१४ मध्ये विम्बल्डन आणि २०११ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.

२०० - ग्रँड स्लॅम स्पर्धेत जोकोविचचा दोनशेवा विजय ठरला. ग्रँड स्लॅम स्पर्धेत जोकोविचने २३४ पैकी २०० सामने जिंकले, तर ३४ सामने गमावले आहेत. जोकोविचने विम्बल्डनमध्ये ५२, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ५०, फ्रेंच ओपनमध्ये ४८ आणि अमेरिकन ओपनमध्ये ५० विजय नोंदविलेत.