Whats new

राज्यातील पोलिस ठाणी ऑनलाइन

online maharashtra police  

ऑनलाइन एफआयआर नोंदविता येणार; महाराष्ट्राला पहिला मान

केंद्र सरकारच्या ई-गव्हर्नन्स अभियानांतर्गत क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिमने (सीसीटीएनएस) महाराष्ट्रातील सर्वच पोलिस ठाणी ऑनलाइन झाली आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, राज्यातील सर्व पोलिस ठाणी ऑनलाइन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले. नागरिकांना आता घरी बसून ऑनलाइन एफआयआर नोंदविता येणार आहे.

या यंत्रणेच्या माध्यमातून कारागृह, न्यायालयाचे कामकाज जोडण्यात येणार आहे. शहरांतर्गत सर्वच पोलिस ठाणी ऑनलाइन झाली आहेत, त्यामुळे पोलिस आयुक्त व उपायुक्‍तांना ठाण्यातील सर्व दृश्‍यं दिसणार आहेत. पोलिस ठाण्यांवर सहायक आयुक्‍त, उपायुक्‍त, अतिरिक्‍त किंवा सहआयुक्‍त तसेच आयुक्‍तांचे थेट नियंत्रण राहील.