Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

'नासा'ला मिळाले प्लुटोवरील काळ्या डागांचे चित्र - "न्यू होरायझन‘ अवकाशयानाकडून छायाचित्र पृथ्वीकडे

pluto  

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा”ने प्लुटोच्या दिशेने सोडलेले न्यू होरायझन या अवकाशयानाने त्याच्यावरील चार काळ्या डागांचे छायाचित्र काढण्यात यश मिळविले आहे. गेली अनेक वर्षे संशोधक या डागांचे चांगले छायाचित्र मिळविण्याचा प्रयत्न करत होते.

न्यू होरायझन 14 जुलैला 2015 प्लुटोच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. या वेळी हे डाग अवकाशयानाला दिसणार नाहीत. छायाचित्र काढलेल्या चार डागांपैकी सर्वांत मोठा डाग 300 मैल पसरलेला असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या डागांच्या आतापर्यंत काढलेल्या छायाचित्रांहून अधिक स्पष्ट आहे. हे सर्व डाग प्लुटोच्या मध्यरेषेवर असून, ते एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर पसरले आहेत. हे डाग म्हणजे नक्की काय आहेत, याबाबत अद्याप अनभिज्ञता आहे. हे डाग म्हणजे प्लुटोवरील विवरे अथवा मैदानेही असू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. याआधीच्या छायाचित्रांशी तुलना करता, हे डाग अधिक क्‍लिष्ट असल्याचे दिसून आले आहे. डाग आणि शेजारील प्रकाशित असलेला भाग यामधील सीमारेषा सुस्पष्ट असल्याने त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

१८ जानेवारी २००६ रोजी अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने पृथ्वीवरून प्लुटोवर एक अवकाशयान पाठवले. पन्नास वर्षांपूर्वी सर्व ग्रह, लघुग्रह यांचा अभ्यास करण्यास आपण सुरुवात केली. मरिनर, पायोनियर, व्होयजर, डॉन अशा अनेक मोहिमांतर्गत आपण सूर्यमालेतील सर्व ग्रहांना भेट दिली. १९६२ शुक्र, १९६५ मंगळ, १९७३ बुध, १९७४ गुरू, १९७९ शनी, १९८६ युरेनस, १९८९ नेपच्यून आणि २०१५ साली न्यू होरायझन्स मार्फत प्लुटो या बटू ग्रहाला भेट देणार आहोत. बटू ग्रह म्हणजे ग्रह या व्याख्येत न बसणारा गोल. बटू ग्रहाला स्वतःची ठराविक किंवा निश्चित अशी सूर्याभोवती फिरण्याची कक्षा नसते. त्याचा जोडीदार व तो (प्लुटो) हे दोघेही एका गुरुत्वाकर्षण बिंदूभोवती फिरत असतात. याउलट, ग्रहाला स्वतःची ठराविक कक्षा असते व त्याचा चंद्र हा उपग्रह त्या ग्रहाभोवती फिरत असतो. प्लुटो भेट ही एक ऐतिहासिक भेट असणार आहे. माहितीचा कोणता नवीन खजिना सापडणार आहे, नवीन चमत्कार घडणार आहे, कोणास ठाऊक??? आधीच्या अंतर्ग्रहीय मोहिमा, आपण खूप प्रगत झाल्याची प्रचिती देतात.

आपल्या सूर्यमालेत ग्रह-गोलांचे ३ प्रकारांत वर्गीकरण केले आहे. एक म्हणजे, दगडी (खडकाळ) ग्रह. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ ही मंडळी दगडी ग्रह. त्यानंतर वायुरूपी ग्रह. यामध्ये गुरू, शनि, युरेनस, नेपच्युन हे ग्रह येतात आणि तिसरा म्हणजे बर्फाळ गोल, जे एका विशिष्ट पट्ट्यामध्ये आढळतात. या पट्ट्यास क्यूपर बेल्ट ऑब्जेक्ट म्हणतात. प्लुटो व त्याची यंत्रणा अर्थात त्याचे जोडीदार या तिसऱ्या प्रकारात मोडतात. असे समजले जाते की, ही बर्फाळ गोलांची मंडळी आपल्या प्राचीन सूर्यमालेचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच सूर्यमालेच्या उत्पत्तीविषयी प्रचंड माहिती दडली गेली असावी, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. या गोलांच्या निर्मितीनंतर इतर दोन प्रकारच्या ग्रहांची निर्मिती झाली. याचाच अर्थ असा की सूर्यमालेच्या इतिहासाबद्दलची माहिती या थंड बर्फाळ गोलांमध्ये लपलेली असल्याने त्यांचा अभ्यास करावाच लागेल. त्याशिवाय सूर्यमालेची उत्पत्ती कशी व केव्हा झाली? पृथ्वी, ग्रह, चंद्र कसे तयार झाले? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल कशी होईल. म्हणून हे न्यू होरायझन्स! प्लुटो पलिकडे (क्यूपर बेल्टमध्ये) १० किलोमीटर व्यासापासून काही शेकडो किमी व्यासाचे अनेक गोल आहेत. यांचा अभ्यास झाल्यावर आपली आपल्या सूर्यमालेच्या ज्ञानाविषयी जी पोकळी आहे ती थोडीफार का होईना, पण भरून निघेल.

न्यू होरायझनचा पल्ला

"नासा”ने 2007 मध्ये सोडलेले हे यान सध्या पृथ्वीपासून तीन अब्ज मैलांवर असून, प्लुटोपासून ते 22 लाख मैल दूर आहे. 14 जुलैला हे यान प्लुटोपासून 12,500 किमी अंतरावरून पुढे जाईल. ते 49,600 किमी प्रतितास या वेगाने पुढे जाईल. या अवकाशयानावर निरीक्षण आणि प्रयोगासाठी सात प्रकारची उपकरणे बसविण्यात आली आहे.