Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

चीनचा महासंगणक लागोपाठ पाचव्यांदा पहिल्या क्रमांकावर

china super computer  

चीनचा 'तिआनहे-२' हा महासंगणक लागोपाठ पाचव्यांदा जगातील सर्वात वेगवान संगणक ठरला आहे. फ्रँकफर्ट येथे घेण्यात आलेल्या सुपरकॉम्प्युटिंग विषयावरील परिषदेच्या वेळी या महासंगणकाने २०१३ पासून पाचव्यांदा जगातील वेगवान महासंगणक म्हणून मान मिळवल्याचे सांगण्यात आले.

चांगसा येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी या संस्थेने हा महासंगणक तयार केला आहे. २०१३ मध्ये हा महासंगणक ग्वांगझाऊ येथील नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटर येथे हलवण्यात आला आहे.

नवीन महासंगणकाची निर्मिती

आतापर्यंत या महासंगणकाने वेगात बाजी मारली असून चीनमध्ये व परदेशात त्याचे ४०० ग्राहक आहेत. जनुक विश्लेषण, जनुकीय औषध निर्मिती, उच्च गती रेल्वे यांच्या कामात त्याचा वापर केला जातो. चीनच्या डॉनिंग इनफॉर्मेशन इंडस्ट्री या कंपनीने नवीन महासंगणक तयार करण्याचे काम हाती घेतले असून तो लाखो महापद्म गणने सेकंदाला करू शकेल, असे कंपनीचे अध्यक्ष ली जून यांनी सांगितले.