Whats new

केरोसिनसाठी १२ रुपये सबसिडी

kerosene  

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत बाजारात मिळणाऱ्या केरोसिनवर केंद्र सरकार सबसिडी देत आहे. ही सबसिडी प्रतिलीटर १२ रुपये इतकी मर्यादित ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

केरोसिनची खरी किंमत ३३.४७ रुपये प्रतिलीटर आहे. मात्र सार्वजनिक वितरण व्यवस्थेत केरोसिन सध्या १४.९६ रुपये प्रतिलीटर या दराने विकण्यात येत आहे. ही किंमत वाढवू नये असे सरकारने स्पष्ट केले आहे. ही रिटेल किंमत सातत्याने तीच ठेवण्यासाठी ओएनजीसीसारख्या कंपन्यांना ५ हजार कोटी ते ६ हजार कोटी रुपये देण्यास सरकारने सांगितले आहे. केरोसिनवर सबसिडी वाढवायची नसल्याने सरकार १२ रुपये प्रतिलीटर ही सबसिडी राज्यांतील इंधन रिटेलर्सना रोखीत देणार आहे. याखेरीज सबसिडीची अधिक रक्कम द्यावी लागल्यास ती ओएनजीसीसारख्या कंपन्या देणार आहेत. सध्याची केरोसिनची किंमत कायम ठेवायची झाल्यास या कंपन्यांना प्रतिलीटर ६.५१ रुपये सरकारला द्यावे लागणार आहेत.