Whats new

‘नाग’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

NAG MISSILE  

प्लॅटफॉर्मवरून सात किलोमीटर अंतरावर मारा करण्याची क्षमत असलेल्या ‘नाग’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. ही चाचणी राजस्थानमधील जैसमलेर भागात असणाऱ्या फायरिंग क्षेत्रात करण्यात आली. नाग ह्या क्षेपणास्त्राची निर्मिती संपूर्ण स्वदेशी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे नाग क्षेपणास्त्र हेलिकॉप्टरच्या माध्यमातून डागले जाऊ शकते. याला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले आहे. नाग या क्षेपणास्त्राला सात किलो मीटरचे लक्ष्य देण्यात आले होते. यासाठी दोन चाचण्या करण्यात आल्या. या दोन्ही चाचण्यांमध्ये या क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य अचूक भेदले. यापुढे यावरती आणखी संशोधन केले जाणार असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. नाग क्षेपणास्त्राची ही तिसरी पिढी असून याअगोदर पोखरण आणि चांदीपूर मध्ये याची यशस्वी चाचणी करण्यात आली होती.