Whats new

IPL स्पॉट फिक्सिंग : चेन्नई, राजस्थानवर २ वर्षांची तर मयप्पन, राज कुंद्रावर आजीवन बंदी

scams  

इंडियन प्रिमीअर लीगच्या सहाव्या सत्रातील भ्रष्टाचार व स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स संघावर दोन वर्षांची तर गुरूनाथ मयप्पन व राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा यां दोघांवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आर.एम.लोढा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय मंडळाने हा निर्णय सुनावला. चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे अधिकारी आयपीएलच्या सामन्यांत सट्टेबाजी करताना दोषी आढळले होते.

मयप्पनच्या कृतीमुळे खेळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मयप्पनने गैरव्यवहार केल्याचे सिद्ध झाले आहे व हा त्याचा पहिला गुन्हा आहे हा मुद्दा तर्कनिष्ठ नाही कारण त्याने अनेकवेळा बेटिंग केले आहे. तसेच राज कुंद्रा हाही  सातत्याने बुकींच्या संपर्कात होता परंतु मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी झाल्याचे सिद्ध झालेले नाही असे लोढा यांनी सांगितले. या दोघांवरही कुठल्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये सहभागी होण्यावर आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात आली आहे.