Whats new

जम्मू-श्रीनगर प्रवास कमी अंतराचा होणार

Tunnel  

जम्मू आणि काश्मीरला जोडणाऱ्या ‘टनेल ऑफ होप’मुळे 2016 मधील पावसाळ्यात तसेच हिवाळ्यामध्ये वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. चेनानी-नस्त्रा फाट्यावरील ह्या बोगद्याचे काम पूर्ण झालेले असेल. तांत्रिकदृष्टय़ा या बोगद्याला ‘डेलाइटिंग’ असे नामाभिदान प्राप्त झाले आहे.

उधमपूर भागातील चेनानीपासून रामबन जिल्ह्यातील नाश्‍री पर्यंत 9.2 कि. मी. लांबी असलेल्या या बोगद्याचे काम 2011 च्या मार्चमध्ये सुरू करण्यात आले होते. या बोगद्याची दोन टोके एकमेकांना मिळण्याची माहिती एनएचएआयचे प्रादेशिक अधिकारी आर. पी. सिंग यांनी दिली. या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगर यातील अंतर 30 किलोमीटरने कमी झाले असून त्यामुळे महामार्ग 1 वरील रहदारी कमी होणार आहे. बोगद्याअभावी महामार्ग-1ए पटनीटॉप येथील हिमवर्षावामुळे रहदारीच्या कोंडीला प्रवाशांना तोंड द्यावे लागत होते. 2011 च्या मार्चमध्ये काम सुरू झालेल्या व काझीगुंड आणि बनिहाळ यांना जोडणाऱ्या 8.45 कि. मी. बोगदा पुढील वर्षाच्या जूनपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या दोन बोगद्याचे काम संपल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील राजधान्यांचे निदान 50 किलोमीटर अंतर कमी होणार असून सध्या या मार्गावरील वाहतुकीस सर्वसाधारण दिवशी 10 ते 11 तास लागतात.