Whats new

चॅम्पियन्स लीग 2015- T20 रद्द

Champions League Twenty20  

2015 सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात होणारी चॅम्पियन्स लीग T20 स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी काल लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स टीमची दोन वर्षासाठी हकालपट्टी केल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयचे सचिन अनुराग ठाकुर म्हणाले, चॅम्पियन्स लीग रद्द करण्याचा निर्णय घेणे अवघड होते. कारण भारतात आयपीएल, ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग आणि दक्षिण आफ्रिकेत रॅम स्लॅम T20 चा जम बसला होता. पण, आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमुळे आयपीएलमधील दोन मोठ्या टीमची प्रतिमा मलिन झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला. 2009 साली बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट दक्षिण अफ्रिकाने मिळून चॅम्पियन्स लीगची सुरूवात केली होती. आत्तापर्यंत याचे 6 वेळा आयोजन करण्यात आले आहे.