Whats new

भारतीय कुस्तीपटूंना 16 पदके

KUSTI 2015  

म्यानमारमध्ये झालेल्या ज्युनियर आशियाई फ्रीस्टाईल, ग्रीकोरोमन व महिला कुस्ती प्रकारात भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकासह एकूण 16 पदकांची कमाई केली. भारतीय खेळाडूंच्या या शानदार कामगिरीमुळे संघाला 68 चॅम्पियन्स ट्रॉफी गुण मिळाले तर ग्रीको रोमन संघाला 59 गुण मिळाले.

पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारताने आठ पदकांची कमाई केली. यात रवी कुमारला (55 किलो) सुवर्णपदक मिळाले. भरत पाटील (50 किलो), विकास (66 किलो) यांना रौप्यपदक तर अमित (60 किलो), दिनेश (74 किलो), परवीन (84 किलो), रुबलजीत (96 किलो) व मनजीत (120 किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

ग्रीकोरोमन प्रकारात भारताने 2 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्यपदक मिळविले. रविंदर कुमार (60 किलो) व मेहर सिंग (120 किलो) यांनी सुवर्ण तर महिला संघाने 1 रौप्य व 3 कांस्यपदकं मिळविली.