Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (सेवा हमी कायदा) - 2015

lokseva vidheyak  

भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि जनतेला सेवा मिळण्याचा हक्क देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (सेवा हमी कायदा) हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले. लोकांना किती दिवसांत सेवा मिळणार, यासंदर्भात 110 सेवा अधिसूचित केले. विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले. या कायद्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवर निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी येणार असून, ते काम न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. अधिसूचित केलेल्या सेवा ठरविलेल्या कालमर्यादेत उपलब्ध होणार असल्याने, प्रशासनामध्ये उत्तरदायित्व, जबाबदारी व पारदर्शकता येईल.

‘दहा राज्यांत हा कायदा आहे. त्यांचा, तसेच जगातील अन्य देशांत यासंदर्भात असलेल्या कायद्याचा, त्याच्या अंमलबजावणीच्या वेळी आलेल्या अडचणींचा अभ्यास करून महाराष्ट्रातील कायदा बनविला आहे. जास्तीत जास्त सेवा त्यामध्ये अधिसूचित केल्या. अधिसूचित करताना किती कालावधीत काम पूर्ण करणार, त्यासाठी शुल्क किती, कागदपत्रे कोणती द्यावयाची याची माहिती अधिकाऱ्यांना जाहीर करावी लागेल. त्यामुळे, योग्य कागदपत्रे दिल्यानंतर, वेळेत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. लोकांना त्यांच्या कामाची माहिती ई-सिस्टिमद्वारे मिळेल. काम न झाल्यास, त्यांना तक्रार करता येईल. आतापर्यंत हा हक्क लोकांना नव्हता. तो मिळाल्यामुळे, भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभार होईल व प्रशासन कार्यक्षम बनेल.