Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

७०० अंतरराष्ट्रीय बळी मिळविणार्यां्मध्ये हरभजन

harbhajan singh  

झिम्बाब्वेविरुद्ध एकदविसीय सामन्यात दोन गडी बाद केल्यानंतर हरभजन सिंग एका विशिष्ट क्लबमध्ये सामील झाला. भज्जी नावाने प्रसिद्ध असलेल्या हरभजनने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० बळी मिळविले आहे. तो असे करणारा जगातील १२ वा गोलंदाज ठरला. भारतीय गोलंदाजांमध्ये भज्जी ७०० बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या पूर्वी अनिल कुंबळेने ९५६ अंतरराष्ट्रीय बळी मिळविले आहे. हरभजनने सिंकरदर रझा बाद करताच अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० बळी पूर्ण केले. त्यानंतरच्या चेंडूत त्याने ग्रीम क्रीमरला बाद केले. परंतु हॅट्ट्रिक करू शकला नाही.

भज्जीने १०२ कसोटीत ४१२ बळी तर २३२ एकदिवसीयमध्ये २६३ बळी घेतले आहे. याशिवाय हरभजनने २५ टी-२0 अंतरराष्ट्रीय सामने खेळुन २२ बळी घेतले आहे. अशाप्रकारे त्याचे एकूण ७०१ अंतरराष्ट्रीय बळी झाले आहे.

 1. मुथैया मुरलीधरन (श्रीलंका) १३४७
 2.  शेन वार्न (ऑस्ट्रेलिया) १००१
 3. अनिल कुंबळे (भारत) ९५६
 4. ग्लेन मॅक्ग्राथ (ऑस्ट्रेलिया) ९४९
 5. वसीम अक्रम (पाकिस्तान) ९१६
 6. शॉन पोलाक (दक्षिण आफ्रिका) ८२९
 7. वकार युनूस (पाकिस्तान) ७८९
 8. चामिंडा वास (श्रीलंका) ७६१
 9. कर्टनी वॉल्श (वेस्टइंडिज) ७४६
 10. ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) ७१८
 11. डेनियल विटोरी (न्यूझीलंड) ७०५
 12. हरभजन सिंग (भारत) ७०१