Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

चित्रकार सईद हैदर रझा यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "लिजन ऑफ ऑनर” पुरस्कार

ligend of hounar  

भारताचे आधुनिक चित्रकार सईद हैदर रझा यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "लिजन ऑफ ऑनर” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मंगळवारी सायंकाळी फ्रान्सच्या दूतावासात आयोजित सोहळ्यात राजदूत फ्रान्कोईस रिचिर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्हीलचेअरवरून आलेले 93 वर्षीय रझा यांनी फ्रान्स सरकारचे आभार मानले. 1802 मध्ये नेपोलियन बोनापार्ट यांनी पुरस्काराची सुरवात केली. हा पुरस्कार फ्रान्ससाठी अतुलनीय कार्य करणाऱ्यांसाठी दिला जातो. रिचिर म्हणाले की, फ्रान्समध्ये अनेक दशके काम करत असताना रझा यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून भारतीय प्रेरणा ही फ्रान्सच्या वातावरणात रुजविण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशमध्ये जन्मलेले रझा यांनी वयाच्या 12 व्या वर्षापासून चित्र काढण्यास प्रारंभ केला. त्यांनी नागपूर येथील स्कूल ऑफ आर्टमध्ये (1939-43) व जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई (1943-47) येथे शिक्षण घेतले. त्यापुढील शिक्षणासाठी ते पॅरिसला गेले (1950-53). त्यांनी कलेच्या प्रसारासाठी युरोपचा दौरा केला आणि सुमारे सहा दशकांहून अधिक काळ फ्रान्समध्ये वास्तव्य केले.