Whats new

ऑबेराय उदयविलास ठरले जगातील सर्वोत्तम हॉटेल

oberao hotel rajastan  

राजस्थानमधील ऑबेराय उदयविलास हॉटेलला दुसऱ्यांदा जगातील सर्वोत्तम हॉटेलचा किताब मिळाला आहे. अमेरिकेच्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात 90 टक्के लोकांनी हे हॉटेल सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे.

राजस्थानमधील उदयपुरमध्ये हे हॉटेल असून, ते सुमारे 50 एकर जागेवर विस्तारलेले आहे. हे आलिशान हॉटेल आपल्याला जेवढे क्लासी वाटते, तेवढेच ते रोमँटिक देखील आहे. हे खूपच सुंदर आणि अद्धभूतही आहे. यात सर्व अत्याधुनिक सुख-सुविधा उपलब्ध आहेत. राहण्याची उत्तम सोय असणाऱ्या या हॉटेलचे लोकेशन, खाद्य पदार्थ, सर्विस, कुकींग क्लासेस, योग क्लासेस, उंटाची सफर, आर्ट क्लासेस आणि स्पा ट्रीटमेंट यांसारख्या आणखी काही खास वैशिष्ट्यांमुळे या हॉटेलला सर्वोत्तम हॉटेलचा किताब देण्यात आला आहे.

हॉटेलच्या आत एक स्वच्छ आणि सुदंर नदी आहे. यात पाहुण्यांना प्रायव्हेट बोटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आजू-बाजूच्या परिसरात हरिण आणि मोर देखील आहेत.