Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

प्रियंका काकोडकर यांनी प्रतिष्ठेचा मानला जाणारा प्रेम भाटिया पुरस्कार 2015

priyanka kakodkar  

प्रियंका काकोडकर यांनी प्रतिष्ठेचा मानला जाणारा प्रेम भाटिया पुरस्कार जिंकला आहे. महाराष्ट्रात संकटात आलेली शेती आणि हतबल शेतकरी यासंबंधी प्रियंका काकोडकर यांनी एक वृत्त मालिका दिली. याबद्दल काकोडकर यांना विकास आणि पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल नवी दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये होणाऱ्या २० व्या प्रेम भाटिया हा पुरस्कार दिला जाणार आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे महाराष्ट्रात दोनवेळा शेतातील पिकं उद्धवस्त झाली. यामुळे ऑगस्ट २०१४ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यान शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात अचानक ४० टक्यांनी झालेली वाढ. यासंदर्भातील सविस्तर आणि सखोल चार बातम्यांची मालिका संपादक प्रियंका काकोडकर यांनी वृत्तपत्रातून दिली. मराठवाड्यातील गावकरी थेंब-थेंब पाण्यासाठी कशाप्रकारे नदी पात्र खणून काढत आहेत? दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातून ग्रामीण जनतेच्या स्थलांतरात ३० टक्क्यांची वाढ कशामुळे झाली? याची माहिती या वृत्त मालिकेतून प्रियंका काकोडकर यांनी दिली.