Whats new

वन-डेतील भारताचे दुसरे स्थान कायम

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ  

झिम्बाब्वेविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन-डे क्रमवारीतील दुसरे स्थान टिकवण्यात यश मिळवले आहे. भारतीय संघाच्या खात्यात ११५ गुण असून अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलिया संघापेक्षा भारत १४ गुणांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या खात्यात १२९ गुण आहेत. भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघालाही वन-डे मालिकेत २-१ असे पराभूत करणाऱ्या बांगलादेश संघाने या क्रमवारीत सातव्या स्थानी झेप घेतली आहे. वन-डे फलंदाजांच्या यादीत भारताचे विराट कोहली (चौथा), शिखर धवन (सातवा) आणि महेंद्रसिंह धोनी (नववा) हे तीन खेळाडू टॉप टेनमध्ये आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स अग्रस्थानी आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत एकाही भारतीय खेळाडूला टॉप टेनमध्ये स्थान पटकावता आलेले नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमार हा सर्वोच्च अशा बाराव्या स्थानी असून अक्षर पटेल अठराव्या, तर मोहित शर्मा ५१ व्या स्थानी आहे. ."