Whats new

हजाराच्या नोटांवर झळकणार अजिंठा लेणी

Ajanta caves  

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने देशातील आठ ऐतिहासिक स्थळांचे चित्र भारतीय चलनावर छापण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताचे सर्वात मोठे चलन असणाऱ्या 1000 रूपयांच्या नोटांवर महाराष्ट्राच्या औरंगाबादमध्ये असणाऱ्या अजिंठा गुहा लेणी आणि अजिंठा गुहेतील पद्मावती छायाचित्र छापण्यात येणार आहे.

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्रालय आणि भारतीय पुरातत्त्व विभाग यांच्यात याविषयी चर्चा झाली. त्यासाठी लागणाऱ्या देशातील आठ ऐतिहासिक स्थळांचे छायाचित्र जमा करण्याचे काम देखील आता भारतीय पुरातत्त्व विभागाला सोपविण्यात आले. त्यामुळे आता 10 ते 1000 रूपयांच्या नव्या नोटांवर ऐतिहासिक वास्तूंचे चित्र दिसणार असून, त्या ऐतिहासिक स्थळांची नावे खालीलप्रमाणे :

 

  1. 10 रूपयांच्या नोटांवर हम्पीतील विजयनगर दगडी रथ
  2. 20 रूपयांच्या नोटांवर दिल्लीचा लाल किल्ला
  3. 50 रूपयांच्या नोटांवर कोणार्कचे सुर्यमंदिर
  4. 100 रूपयांच्या नोटांवर आग्य्राचा ताजमहल
  5. 500 रूपयांच्या नोटांवर गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट
  6. 1000 रूपयांच्या नोटांवर महाराष्ट्रातील अजिंठा गुहा लेणी