Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

2014 ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष - संशोधन

INTERNATIONAL MATHS OLAMPIC  

मागील 2014 हे वर्ष सर्वाधिक उष्ण होते, अशी माहिती अलिकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आली आहे. या संशोधनासाठी 58 देशांतील 413 शास्त्रज्ञांनी योगदान दिले आहे.

स्टेट ऑफ द क्लायमेट इन 2014’ या विषयावर करण्यात आलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. वाढत चालेलेले समुद्राचे तापमान, पृथ्वीवरील पाण्याचे कमी होत चाललेले प्रमाण, समुद्राची मर्यादा, ग्रीन हाऊसमधून बाहेर पडणारा वायू आदी कारणांमुळे 2014 हे उष्ण वर्ष ठरले आहे. 1901 पासून करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय नोंदणीप्रमाणे सर्वाधिक उष्णता असलेले हे पाचवे वर्ष ठरले आहे. भारताचे वार्षिक सरासरी तापमान 0.52 डिग्री सेल्सियस होते. ते 1961-90 पेक्षा अधिक झाल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे.

"या संशोधनामध्ये जगाची माहिती देण्यात आली आहे. शेकडो शास्त्रज्ञांनी 2014 मध्ये नेमके काय घडले याचे चित्र समोर आणले आहे” अशी माहिती राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासनाचे थॉमस कार्ल यांनी दिली आहे. "विविध निर्देशकांवरून वातावरण कशाप्रकारे बदलत आहे हे दिसून येते. केवळ तापमानावर आधारित नव्हे तर समुद्राच्या तळाच्या वातावरणाचाही अभ्यास करण्यात आला आहे” असेही कार्ल यांनी पुढे सांगितले.