Whats new

लोढा समितीच्या निर्णयावर समितीची स्थापना

CRICKET  

आयपीएल फिक्सिंग प्रकरणामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीने दोन वर्षांची बंदी लादली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बैठकीमध्ये या निर्णयावर अभ्यास करून त्याचा तपशील देण्यासाठी आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, चेन्नई आणि राजस्थान या दोन संघांविषयी बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना या वेळी मंडळाने केवळ समिती स्थापून तूर्तास या संघाबाबतचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. मुंबईमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पूर्णपणे पालन करण्याचे स्पष्ट केले आहे.