Whats new

अंटार्क्टिकामध्ये सापडला सर्वात जुना शुक्राणू

antartica  

वैज्ञानिकांनी अंटार्क्टिकामध्ये एक कोकूनच्या अवशेषांच्या वरच्या हिस्स्यात संलग्न जवळपास 5 कोटी वर्षांपेक्षाही अधिक जुन्या एका जीवाचा शुक्राणू शोधून काढला आहे. संशोधनकर्त्यांचे मानणे आहे की, कृमी सारख्या कोणत्याही प्राचीन प्रजातीच्या जीवाने संसर्गादरम्यान कोष निर्मितीच्या प्रक्रियेत हा शुक्राणू याच्या आत सोडला असावा. कोषाचे आवरण कठोर होण्याआधी तो शुक्राणू तेथे अडकला असण्याची शक्यता आहे. कोषामुळे शुक्राणू कोशिका संरक्षित राहीली, तर लाखो वर्षांपर्यंत हा जीवाश्मच्या रुपातच राहिला असे संशोधनकर्त्यांनी सांगितले.

नैसर्गिक इतिहासाच्या स्वीडनच्या एका संग्रहालयातील जीवाश्म तज्ञ आणि शोधाचे प्रमुख लेखक बेंजामीन बोमफ्ल्यूर यांनी अंटार्क्टिकामध्ये जोंकच्या कोषात शुक्राणूचा आमचा हा शोध आतापर्यंत सर्वात जुना जीव शुक्राणू आहे आणि भूवैज्ञानिक नोंदीत याप्रकारचा सर्वात छोटा जीवाश्म असल्याचे म्हटले. लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार संशोधनकर्त्यांना हा कोष अंटार्क्टिका मोहिमेदरम्यान छोट्या कशेरूकी जीवांच्या अवशेषांच्या सुक्ष्म तपासणीदरम्यान मिळाला आहे. जीवाश्मचे आवरण आणि त्याच्यावर असणाऱ्या कणांच्या तपासणीसाठी एक उच्च मॅग्निफिकेशन असणाऱ्या स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर त्यांनी केला. याशिवाय त्यांनी स्वीत्झर्लंडमध्ये कोषाच्या अंतर्गत संरचनेची प्रतिमा प्राप्त करण्यासाठी एक पार्टिकल एक्स्लेटरद्वारे उच्च शक्तिवाल्या एक्स-रे चा देखील वापर करण्यात आला.