Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

“ब्रिक्स” देशांच्या बॅंकेचे शांघायमध्ये सुरुवात

BRICSBANK  

जगात नव्याने उदयास येत असलेल्या अर्थव्यवस्थांना पायाभूत निधी पुरविण्यासाठी ब्रिक्स (ब्राझील, रशिया, चीन, भारत व दक्षिण आफ्रिका) देशांनी एकत्रितरित्या स्थापन केलेल्या बॅंकेच्या (एनडीबी) कामकाजाची शांघाय येथील मुख्यालयामधून औपचारिक सुरुवात झाली.

कामत हे एनडीबीचे प्रथम अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक व्यवस्थेस एनडीबी पूरक असेल. रशियातील उफा येथे नुकत्याच झालेल्या 7 व्या ब्रिक्स परिषदेत एनडीबीची घोषणा करण्यात आली होती.

सध्या या बॅंकेकडे 50 अब्ज डॉलर्सचे भांडवल असून येत्या दोन वर्षांत हे भांडवल 100 अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे. या भांडवलामध्ये प्रत्येक सभासद देशाचा समान वाटा असणार आहे. याशिवाय, चीनच्या पुढाकारामधून सुरु झालेल्या आशिया पायाभूत गुंतवणूक बॅंकेचाही एनडीबीस पाठिंबा आहे. भारतासहित अन्य 56 देश या बॅंकेचे सभासद आहेत. जागतिक बॅंकेने एनडीबीचे स्वागत केले आहे.