Whats new

हॉकी प्रशिक्षक ऍस्स यांना तडकाफडकी डच्चू

Paulvan Ass  

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला अवघ्या वर्षभराचा कालावधी बाकी राहिलेला असताना हॉकी इंडियाने पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक पॉल व्हान ऍस्स यांना तडकाफडकी डच्चू दिला. हॉकी इंडियाने सदर निर्णयाची माहिती दिली. डचमन ऍस्स सध्या मायदेशी, रॉटरडॅम-हॉलंड येथे असून या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. ऍस्स अवघ्या 5 महिन्यांपूर्वी हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी रुजू झाले होते.

अलीकडेच संपन्न झालेल्या हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल्स स्पर्धेनंतर पॉल व्हान ऍस्स मायदेशी परतले होते. तेथेच त्यांना सदर निर्णयाबद्दल ईमेलवरुन कळवण्यात आले. यापूर्वी शिलारु, हिमाचल प्रदेश येथे संघासाठी आयोजित तंदुरुस्ती शिबिरात ऍस्स दाखल झाले नाहीत, त्याचवेळी सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर सोमवारी हॉकी इंडियाने हा निर्णय जाहीर केला.