Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

टी-२० वर्ल्डकपची फायनल इडनवर

ICC T-20 CUP  

2016 वर्षी रंगणाऱ्या टी-२० वर्ल्डकपची अंतिम लढत कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. ही स्पर्धा प्रथमच भारतात होत आहे. भारताने २००७ चा टी-२० वर्ल्डकप जिंकला असून, २०१४ मध्ये भारत उपविजेता ठरला होता. बेंगळुरू, चेन्नई, धर्मशाला, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाता या आठ ठिकाणी टी-२० वर्ल्डकपचे सामने खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. अर्थात त्यासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करणे प्रत्येक स्टेडियमला बंधनकारक असेल, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेची एक उपांत्य लढत मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. दुसरी उपांत्य लढत नवी दिल्लीच्या फिरोझ शाह कोटला मैदानावर होण्याची शक्यता आहे.
स्पर्धा कालावधी :
११ मार्च ते ३ एप्रिल २०१६
स्पर्धा स्थळ :
बेंगळुरू, चेन्नई, धर्मशाळा, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाता.
अंतिम लढत :
इडन गार्डन्स, कोलकाता
उपांत्य फेरी :
वानखेडे स्टेडियम, मुंबई; फिरोझ शाह कोटला, नवी दिल्ली.
व्यवस्थापन समिती :
जगमोहन दालमिया (चेअरमन), अनुराग ठाकूर, अमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी, जी. गंगा राजू, राजीव शुक्ला, आशिष शेलार, असीर्बाद बेहेरा.
यापूर्वीचे यजमान :
२००७ - द. आफ्रिका; २००९ - इंग्लंड; २०१० - वेस्ट इंडिज; २०१२ - श्रीलंका; २०१४ - बांगलादेश.