Whats new

ट्रायथलॉन जिंकून मिलिंद सोमण बनला ‘आयर्नमॅन’

milind soman  

स्वित्झर्लंडमधील झुरिचमध्ये भरविण्यात येणाऱ्या सर्वांत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘ट्रायथलॉन’ स्पर्धेत बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमणने बाजी मारली. वयाच्या 50 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकलेल्या सोमण यांना ‘आयर्नमॅन’ हा किताब देण्यात आला असून, त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

झुरिचमध्ये भरवल्या जाणाऱ्या ट्रायथलॉनमध्ये प्रामुख्याने धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे यांसह वेग-वेगळ्या ऍथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. ठरवून दिल्याप्रमाणे या तिन्ही क्रीडाप्रकारात स्पर्धकाला अंतर पार करावे लागते. या स्पर्धेत 7 भारतीयांसह देश-विदेशातील दोन हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता.

मिलिंद यांनी 3.8 स्विमिंग, 180.2 सायकलिंग आणि 42.2 किमी धावण्याचे अंतर पार करून आयर्नमॅनचा किताब मिळवला आहे. 16 तासांत पार करण्याची ही स्पर्धा त्यांनी 15 तास 19 मिनिटांत पूर्ण केली. मिलिंद यांच्या आधी पुण्याच्या कौस्तुभ राडकरने ही स्पर्धा 12 तास 32 मिनिटांत पूर्ण केली होती. तब्बल 12 वेळा कौस्तुभ आयर्नमॅनचा मानकरी ठरला आहे.