Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

2030 पर्यंत एड्स पूर्णपणे हद्दपार होईल : संयुक्त राष्ट्र संघटना

AIDS  

2030 सालापर्यंत एड्स पूर्णपणे हद्दपार होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघटनेनं वर्तवला आहे. भारतासह जगभरातील तीन कोटी एचआयव्हीच्या नव्या रुग्णांना गेल्या 15 वर्षांत वाचवण्यात यश आलं आहे. एचआयव्हीची सर्वात जास्त रुग्ण आढळणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश होतो.

2015 मध्ये म्हणजे यावर्षीपर्यंत दीड कोटी एचआयव्हीग्रस्त उपचार घेत आहेत. 2011 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्यांनी एचआयव्हीग्रस्तांची संख्या कमी करण्याची जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं, ते सत्यात उतरलं आहे. 2000 सालापासून एड्स संबंधित 80 लाख रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

एड्सबाबत भारतातील सद्यपरिस्थिती :
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार, 2000 ते 2014 या वर्षांदरम्यान भारतात एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत 20 टक्क्यांनी घट झाली आहे आणि हे मोठं यश आहे. 2014 मध्ये एड्स संबंधित 7 लाख 85 हजार 19 रुग्णांवर अँटी रेट्व्हायरल उपचार केले जात आहेत. चिंतेची बाब अशी की, यामध्ये 11 हजार 724 गर्भवती महिलांचा समावेश आहे. याशिवाय, 14 वर्षांच्या खालील 45 हजार 546 मुलांवर उपचार सुरु आहेत.