Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सायबर क्राइममध्ये महाराष्ट्र दुसरा

cyber crime  

बदनामी करण्यापासून राष्ट्रविरोधी कारवायापर्यंत सोशल मिडीयाचा वारेमाप वापर होत असल्याची ओरड असतानाच या माध्यमावर देखरेख ठेवण्यासाठी सरकार कोणत्याच प्रकारचे विशेष नेटवर्क स्थापन करणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले. त्याचवेळी ताज्या आकडेवारीनुसार देशात सायबर क्राईममध्ये महाराष्ट्र क्रमांक दोनचे राज्य ठरल्याची धोक्याची घंटाही वाजविली.

डाटा सिक्युरिटी कौन्सील ऑफ इंडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यातील जागरूकता व संबंधित पोलीस यंत्रणेच्या प्रशिक्षणासाठी सायबर कायदा व विज्ञान प्रयोगशाळा मुंबई व पुण्यात स्थापण करण्यात आल्याने सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण करण्याचे काम जलद होत असल्याचे सांगण्यात आले. मागील तीन वर्षांत सायबर क्राईमच्या सर्वाधिक तक्रारी व गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले असून अटकेच्या कारवाईत मात्र उत्तरप्रदेश अव्वल आहे. देशाची राजधानी व गुन्हेगारी जगाचे लक्ष्य ठरलेल्या दिल्लीत व सायबर हब असलेल्या आंध्रप्रदेशाच्या हैद्राबादेत अनुक्रमे २३७ व २८२ तक्रारी गेल्या वर्षभरात दाखल झाल्या.

गृह विभागाने ताज्या माहितीत म्हटले आहे की, आय टी अधिनियम, भारतीय दंडविधान तसेच स्थानिक कायद्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्रात कारवाई करण्यात आली. देशातील २९ राज्यांत मागील वर्षी ९,३२२ तक्रारी दाखल झाल्या असून ५,६४३ जणांना अटक करण्यात आली. इंडियन कम्प्युटर इमरजंसी रिस्पाँसच्या माध्यमातून तक्रारींचे विश्लेषण केले जाते.