Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

लख्वीबाबतचा भारताचा प्रस्ताव चीनने धुडकावला

 

लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर झकी-उर-रेहमान लखवी याच्या सुटकेविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तानवर कारवाई करावी, अशा आशयाचा भारताने मांडलेला प्रस्ताव चीनने रोखला. भारताने यासंदर्भात पुरेसे पुरावे दिले नसल्याचे चीनने म्हटले आहे. भारताने मांडलेल्या या प्रस्तावाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रसंघाच्या निर्बंध समितीची  येथे बैठक झाली. मात्र चिनी प्रतिनिधीने भारताचा पाकिस्तानवर निर्बंध लादण्यासंदर्भातील हा प्रस्ताव नकाराधिकार वापरत अडवला.

भारताचे राष्ट्रसंघामधील कायमस्वरुपी प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी या समितीचे मुख्याधिकारी जिम मॅकलाय यांना गेल्या महिन्यामध्ये लिहिलेल्या पत्रामध्ये, लखवीला सोडण्याच्या पाकमधील न्यायालयाच्या निर्णयामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने संमत केलेल्या प्रस्तावाचे उल्लंघन झाल्याचे म्हटले होते. अल कायदा, लष्करे तैयबा वा अन्य दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या संस्था वा व्यक्तींवर निर्बंध लादण्यासंदर्भातील हा प्रस्ताव होता.

लखवी याची न्यायालयाने सुटका केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनीही चिंता व्यक्त करत त्याला पुन्हा अटक करण्याची मागणी केली होती. मुंबईमध्ये नोव्हेंबर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना व अंमलबजावणी लखवीने केल्याचा आरोप त्याच्याविरोधात आहे. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये 166 नागरिक मृत्युमुखी झाले होते. जमात उद दवा या पाकमधील अन्य दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हफीझ सईद याचा जवळचा नातेवाईक असलेल्या लखवी याला यासंदर्भात तब्बल वर्षभराने अटक झाली होती. मात्र त्यानंतर न्यायालयाने गेल्या 9 एप्रिल रोजी त्याची मुक्तता केली होती.