Whats new

उत्तर प्रदेशात सर्वाधिक स्मार्ट सिटी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उत्तरप्रदेश राज्यात सर्वात जास्त शहरे उभारण्यात येणार आहेत. सरकार देशभरात 100 स्मार्ट सिटी उभारणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून अमृत योजनेंतर्गत शहरांचा विकास करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी आणि अमृत शहरांची निवड केली आहे. त्यानंतर तामिळनाडू राज्याचा दुसरा तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. पंतप्रधान नरेंद मोदी 100 स्मार्ट सिटी, 500 अमृत शहरे आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणी करतील.

उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 13 स्मार्ट सिटींची उभारणी करण्यात येणार आहे. अमृत योजनेंतर्गत 54 शहरांचा विकास करण्यात येणार असल्याचे नागरी विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने  सांगितले. तामिळनाडू राज्यात 12 स्मार्ट शहरे आणि 33 अमृत शहरांची निवड करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात 10 नवी शहरे उभारण्यात येणार आहेत. गुजरात आणि कर्नाटक राज्यात प्रत्येकी सहा शहरे उभारण्यात येणार आहेत. अमृत प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात 37, गुजरातमध्ये 31 तर कर्नाटकात 21 शहरांचा विकास करण्यात येणार आहे.