Whats new

विकास महामंडळांवरील सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा

 

राज्यातील विकास मंडळांना पाच वर्षांची मुदतवाढ मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळांवरील तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्‍त्या जाहीर केल्या. ऍड. मधुकरराव किम्मतकर (नागपूर), कपिल चांद्रायण (नागपूर), डॉ. रवींद्र देवराव कोल्हे (वैरागड, ता. धारणी, जि. अमरावती), डॉ. किशोर मोघे (ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, वणी, जि. यवतमाळ) व डॉ. आनंद अभय बंग ("सर्च‘, ता. धानोरा, जि. गडचिरोली) यांची विदर्भ विकास महामंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.