Whats new

भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या रिंगणात

 

भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक बॉबी जिंदाल यांनी 2016 रोजी होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे जिंदाल हे भारतीय वंशाचे पहिले अमेरिकी नागरिक आहेत.

अमेरिकेच्या ल्युसियाना प्रांताचे गर्व्हनर बॉबी जिंदाल यांनी रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 44 वर्षीय जिंदाल यांचा जन्म ल्युसियाना प्रांताची राजधानी बॅटन रूज येथे झाला. त्यांनी 2003 मध्ये पहिल्यांदा ल्युसियाना प्रांताच्या गर्व्हनरपदाची निवडणूक लढविली होती. मात्र, थोड्या मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ते दोन वेळा सिनेट सदस्य म्हणून निवडणून आले. 2008 मध्ये अमेरिकेत गर्व्हनर बनणारे जिंदाल पहिले भारतीय ठरले.