Whats new

निकेश अरोरा सॉफ्टबँक कॉर्पचे नवे अध्यक्ष, महिन्याचा पगार तब्बल 1 अब्ज 20 कोटी रुपये

 

गूगलचे माजी कार्यकारी अधिकारी निकेश अरोरा यांची जपानची टेलिकम्युनिकेशन कंपनी सॉफ्टबँक कॉर्पच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. भारतीय वंशाच्या निकेश यांच्या पगाराचा आकडा पाहिलात तर तुम्हालाही धक्का बसेल.

कंपनीने निकेश यांना सप्टेंबर 2014 ते मार्च 2015 या काळात त्यांना तब्बल 850.5 कोटी रुपये पगार दिला आहे. या हिशेबाने निकेश यांचा एका महिन्याचा पगार 1 अब्ज 20 कोटी रुपये होतो. म्हणजे त्यांचा एका दिवसाचा पगार सुमारे 4 कोटी रुपये आहे.

गूगलमध्ये चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून काम केलेले 47 वर्षांचे निकेश पहिल्यांदा सॉफ्टबँक कॉर्पमध्ये उपाध्यक्ष होते. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या शेअरहोल्डर्सच्या जनरल मीटिंगमध्ये त्यांची अध्यक्ष आणि चीफ ऑपरेशन ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली. 2012 मध्ये गूगलमध्येही निकेश अरोरा हेच सर्वाधिक पगार घेणारे अधिकारी होते.