Whats new

ब्रिटनमध्ये 3 भारतीयांचा ‘क्वीन्स यंग लीडर्स पुरस्कारा’ने सन्मान

 

ब्रिटनमध्ये दोन महिलांसह तीन भारतीयांना लोकांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ‘क्वीन्स यंग लीडर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात भारताच्या अश्विनी अगादी(26), देविका मलिक(24) आणि अक्षय जाधव(27) यांचा समावेश आहे. 

लंडनच्या बकिंघम पॅलेसमध्ये काल एका भव्य कार्यक्रमात 60 जणांना क्वीन्स यंग लीडर्स पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष व्यक्ती, लैंगिक समानता, शिक्षण आणि हवामान या चार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

जगभरातील 53 देशांमधील प्रतिभावंत तरूणांच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी दुसऱ्या महारानी एलिझाबेथ यांनी क्वीन्स यंग लीडर्स पुरस्काराची स्थापना केली होती. गेल्या वर्षी त्यांचा नातू प्रिन्स विल्यमने याची सुरूवात केली. यात जाधवला महाराष्ट्रातील विदर्भाच्या ग्रामीण कृषी क्षेत्रात शैक्षणिक अभ्यास सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर, देविका मलिकला तिच्या व्हीलिंग हॅप्पीनेस फाउंडेशनच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आहे. ही संस्था अशक्त लोकांसाठी पैसे जमा करून त्यांना सशक्त करण्याचे काम केले जाते. बेंगळूरच्या अश्विनी अगादीने अंध आणि मूक-बधिर मुलांसाठी ब्रेल आणि ऑडिओ पुस्तकांची मोठी लायब्ररी स्थापन केली आहे.

क्वीन्स यंग लीडर्स या पुरस्कारात कोणत्याच प्रकारची रोख रक्कम दिली जात नाही. ज्या 60 जणांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे, ते महाराणी आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांची भेट घेणार आहेत.