Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

पाठविलेला ई-मेल ‘अनडू’ करता येणार

 

एकदा बोललेला शब्द आणि बंदुकीतून सुटलेली गोळी परत घेता येत नाही असे म्हटले जाते. ई-मेलबाबतही ही बाब आतापर्यंत खरी होती. पण जी-मेलने नुकत्याच आणलेल्या नव्या तंत्राच्या साहाय्याने एकदा पाठविलेला ई-मेल परत घेण्याची वा अनडू करण्याची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

एकदा पाठविलेल्या ई-मेलमध्ये काही सुधारणा करायच्या असतील वा तो पाठवू नये असे वाटत असेल, तर तो ई-मेल अनडू करता येईल; पण हा निर्णय ई-मेल पाठविल्यानंतर ३० सेकंदात घ्यावा लागेल. ३० सेकंद उलटल्यानंतर ई-मेल अनडू करू पाहाल तर तो अनडू होणार नाही.

गुगलने आपल्या जी-मेल बॉक्समध्ये नवीन सुविधा जोडली आहे. खरेतर जी-मेलच्या पब्लिक बीटा आवृत्तीवर ही सुविधा २००९ पासूनच सुरू होती; पण आता डेस्कटॉप युजर्ससाठी सहा वर्षानंतर ही सुविधा सुरू झाली आहे. ज्यांच्याकडे ही सुविधा आधीपासूनच सुरू आहे, त्यांच्यासाठी ती सुरूच राहील; पण ज्यांना ही सुविधा नव्याने सुरू करायची आहे त्यांना जी-मेलच्या युजर्सच्या सेटिंगमध्ये जाऊन ती सुरू करावी लागेल.