Whats new

मतदान सक्तीचा गुजरात सरकारचा निर्णय

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 18 वर्षांवरील सर्व मतदारांना मतदान सक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. त्यासाठी नवीन कायदा तयार करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत.

हा कायदा लागू झाल्यास मतदान न करणाऱ्या मतदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये गुजरात राज्यातील 7 महापालिका आणि 300 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने मतदान सक्तीचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मतदानापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी ऑनलाईन मतदानाचा पर्याय उपलब्ध करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.

दरम्यान, मतदान सक्ती कायद्याचा अहवाल सरकारला सुपूर्द केला आहे. आता सरकारकडून त्यावर अधिसुचना काढून नागरिकांच्या हरकती मागविण्यात येतील. त्यानंतर हा कायदा लागू करण्यात येईल, अशी माहिती मतदान सक्ती कायदा मसुदा समितीचे अध्यक्ष के. सी. कपूर यांनी दिली.