Whats new

डीएचएल लॉजिस्टिक उत्तर भारतात करणार 115 कोटींची गुंतवणूक

 

उत्तर भारतात डीएचएल लॉजिस्टिक ने निवड केलेल्या जागेत फ्री ट्रेड झोन (एफटीझेड) बनविण्यात येणार आहे. पुढील वर्षापर्यंत दीड करोड युरो (अंदाजे 115 कोटी रुपये) गुंतवणूक करणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य़ कार्यकारी अधिकारी समरनाथ यांनी सांगितले.

समरनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने उत्तर भारतात दोन जागांची निवड केली आहे. या प्रकल्पामध्ये (एफटीझेड) मध्ये 50 लाख युरो ते 1.5 कोटी युरोपर्यंत गुंतवणूक करण्यात येणार आहे. पाच वर्षापूर्वी डीएचएल लॉजिस्टिक प्रा. लि. ने. पहिला एफटीझेड चेन्नई आणि दुसरा मुंबई बनविला होता. उत्तर भारतात साकारण्यात येणाऱ्या एफटीझेडचे डिझाइन लाइफ सायन्स आणि फार्मा इंडस्ट्रीज, ऑईल आणि गॅस तसेच एविएशन सेक्टरमधील हार्डवेअर शिवाय लग्जरी उत्पादन इ. साठी वेळ तापमानाच्या दृष्टीने हिशेब केला जाण्याची शक्यता आहे.