Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

प्रतापराव पवार यांचा ‘पुण्यभूषण’ने गौरव

 

पुण्यभूषण फाउंडेशनचा यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान. नांगराच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजीची प्रतिकृती व एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

उद्योग, पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रात सुमारे चाळीस वर्षांपासून प्रतापराव पवार कार्यरत आहेत. त्यांना गेल्या वर्षीच ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्षपद; तसेच वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्सचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणूनही पवार यांची निवड झाली होती. भारत फोर्ब्ज, फोर्स मोटार्स, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, फिनोलेक्‍स केबल्स या कंपन्यांच्या संचालक मंडळांवर ते कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ‘विद्यार्थी सहायक समिती’च्या विश्वस्तपदाची धुरा ते १९८१ पासून सांभाळत आहेत. पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड, बालग्राम, किर्लोस्कर फाउंडेशन, पुणे बालकल्याण संस्था, डॉ. नानासाहेब परुळेकर चॅरिटी ट्रस्ट, सकाळ इंडिया फाउंडेशन यांसह सुमारे बारा संस्थांवर पवार पदाधिकारी आहेत. पुणे विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’, ‘पारखे उद्योजकता पुरस्कार’ यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी पवार यांना गौरविण्यात आले आहे.

‘‘राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचा ठसा उमटविणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ दिला जातो. त्यानुसार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्रतापराव पवार यांच्या नावाची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे’’

- डॉ. सतीश देसाई, अध्यक्ष, पुण्यभूषण फाउंडेशन