Whats new

फ्रान्स, कुवेत, टय़ूनिशियात दहशतवादी हल्ले

 

इस्लामी दहशतवाद आता अधिकाधिक उग्र स्वरुप धारण करू लागला असून एकाच दिवसात फ्रान्स, कुवेत आणि टय़ूनिशिया या देशांमध्ये आत्मघाती हल्ले घडवून आणण्यात आल्याचे वृत्त आहे. फ्रान्समधील हल्ल्यात एका व्यक्तीचा शिरच्छेद करण्यात आला असून एका इंधन केंद्राला आग लावण्यात आली आहे. कुवेतमध्ये शिया मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 25 शिया भाविक ठार झाले आहेत. टय़ूनिशिया देशात हॉटेलमधील गोळीबारात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी फ्रान्स आणि टय़ूनिशियातील हल्ल्यांची जबाबदारी आयएसआयएसने स्वीकारली आहे.

जगभरातून या हल्ल्यांचा निषेध होत असून लवकरात लवकर इस्लामी दहशतवादी संघटनांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. विशेषतः आयएसआयएसला वेळीच ठेचण्यात आले नाही, तर ही विषवल्ली जगभर फैलावण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.