Whats new

आशा भोसलेंचा ‘महान पार्श्वगायिका’ म्हणून गौरव

 

यूकेमधील ‘ईस्टर्न आय; या वृत्तपत्राने ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘महान पार्श्वगायिका’ म्हणून घोषित केले आहे. गाण्यांची संख्या, मान-सन्मानांची यादी, लोकप्रियता, चित्रपटसृष्टीतील स्थान आणि रसिकांची मांदियाळी या निकर्षांवर आशा भोसले यांची निवड झाली आहे.

वृत्तपत्राच्या मनोरंजन विभागाचे संपादक असजाद नाझीर यांनी चित्रपटसृष्टीचा इतिहास आणि सध्यःस्थितीचा अभ्यास करून आशा भोसले यांच्या नावावर शिक्कामोतर्ब केले. आशा भोसले यांच्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर, महम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश यांचा नंबर लागतो.